बीआरटी स्थानके बनली मद्यपींची आश्रयस्थाने

By admin | Published: June 1, 2017 02:05 AM2017-06-01T02:05:31+5:302017-06-01T02:05:31+5:30

शहरातील वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी आखलेला बीआरटी प्रकल्प अद्यापही अपूर्ण स्थितीतच आहे. प्रशासनाच्या

Alcoholic shelters made of BRT Stations | बीआरटी स्थानके बनली मद्यपींची आश्रयस्थाने

बीआरटी स्थानके बनली मद्यपींची आश्रयस्थाने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : शहरातील वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी आखलेला बीआरटी प्रकल्प अद्यापही अपूर्ण स्थितीतच आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे बीआरटी मार्ग व स्थानके धुळखात पडून आहेत. यामुळे शहरात वाहतूककोंडीच्या घटना वांरवार घडत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या शहरातील बीआरटी मार्गाची वापरण्यापूर्वीच दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे लक्ष देण्यास ना महापालिका प्रशासनाला वेळ आहे ना पोलिसांना. यामुळे बीआरटी मार्गाचा वापर सध्या वाहनधारक पार्किंगसाठी करीत आहेत, तर मद्यपी व भिकाऱ्यांची तर आश्रयस्थान बनले आहे.
आसपासच्या वस्त्यामधील नागरिकांकडून कपडे वाळत घालण्यासाठी बीआरटी मार्गावरील लोंखडी कठड्यांचा वापर होत आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी येथील बीआरटी स्थानके सध्या भिकाऱ्यांची आश्रयस्थाने बनली आहे. या ठिकाणी शहरातील मुख्य चौकात भिक्षेकरी अढळून येतात. मात्र, या भिकाऱ्यांना कोणीच हटकत नसल्यामुळे बीआरटी स्थानके भिकाऱ्यांची निवासस्थाने बनली आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. बीआरटी मार्गावरील सुरक्षारक्ष फक्त नावापुरतेच बीआरटी मार्गावर वाहने लावण्यास मनाई असतानाही हे सुरक्षा कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेतात. व हेच सुरक्षारक्षक आपलीच वाहने बीआरटी मार्गावर लावतात. यामुळे अनेक वाहनधारक यामुळे वाहने या मार्गावर बिनधास्तपणे पार्क करतात.

दुरवस्था : नियोजनाअभावी प्रकल्प धुळखात

प्रचंड पैसे खर्च करून बीआरटी बस सेवेसाठी निगडी जकातनाका येथे बीआरटीचे स्थानक बांधण्यात आले. मात्र, हे बीआरटी स्थानक वापराविणा धुळखात पडून आहे. मात्र, हे बीआरटी स्थानक दिवसा व रात्रीसाठी मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी मद्यपी बिनधास्तपणे मद्य प्राशन करताना अढळून येतात. तर बहुतांश मद्यपी निद्रावस्थेत असतात. यामुळे या बीआरटी स्थानकाचा वापर मद्यपी करीत आहेत़
बीआरटीचा वापर पार्किंगसाठी
शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटी मार्गांची निर्मिती करण्यात आली. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे बीआरटी मार्ग धुळखात पडून आहेत. बीआरटी मार्गावर वाहन लावण्यास बंदी असताना या मार्गांचा सध्या वापर वाहनधारक आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी होत आहे. मात्र, याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना वाहतूक विभागाचे.

अपघातांना आमंत्रण देणारे कठडे
बीआरटी मार्ग व मुख्य रस्ता यांच्या मधोमध सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्यांचे कठडे बांधण्यात आले आहेत. परंतु, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागल्याने काही लोंखडी जाळ्या मोडल्या आहेत, तर काही जाळ्यांचे लोखंडी गज मार्गावर आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे़ यामुळे या लोखंडी जाळ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

प्रकल्प बासनात; कोट्यवधी रुपये पाण्यात
कोट्यवधी रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करत सुरू केलेला बीआरटी प्रकल्प बासनात गुंढाळण्यात आल्याची आता केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे. सामान्य नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा अधिकार पालिकेला कुणी दिला? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Web Title: Alcoholic shelters made of BRT Stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.