पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:57 PM2018-08-13T20:57:54+5:302018-08-13T21:03:31+5:30

पवना, मावळ परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सहा दरवाजातून ४५७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

alert to the villages on Pawana river | पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next
ठळक मुद्देशिवली, भडवली,काटेवाडी,येवलेवाडी,येलघोल,या गावांचा पुलावरुन होणारा संपर्क तुटला

पवनानगर : पिंपरी चिंचवड व मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारे पवनाधरणातुन सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासुन ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केल्याने शिवली येथील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिवली, भडवली,काटेवाडी,येवलेवाडी,येलघोल,या गावांचा  या पुलावरुन होणारा संपर्क तुटला आहे.पवनानदीकाढच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण १००% भरले आहे व शुक्रवार (दि १०) धरणाच्या सांडव्या वरुन ८००क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता तर शनिवारी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे शनिवारी सकाळी १५०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. शनिवारी दिवसभर पावसाचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी २२०८ क्यसेकने पाणी सोडण्यात आले आहे.पण रात्रभर पावसाचे प्रमाण वाढल्याने रविवारी नऊच्या सुमारास ३३८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु, पवना, मावळ परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सहा दरवाजातून ४५७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती ए.एम गदवाल यांनी दिली.

Web Title: alert to the villages on Pawana river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.