प्रभागामुळे युती, आघाडीची शक्यता
By admin | Published: May 29, 2016 03:46 AM2016-05-29T03:46:38+5:302016-05-29T03:46:38+5:30
महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा प्रभाग होणार असून, त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातीलही राजकीय समीकरणे बदलणार आहे. चार वॉर्डांच्या
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा प्रभाग होणार असून, त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातीलही राजकीय समीकरणे बदलणार आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे व्यक्तीऐवजी पक्षाला महत्त्व दिले जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महापालिकेत सत्तेत येण्यासाठी मागील निवडणुकीत जरी स्वतंत्र लढले असले, तरी काँगे्रस आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यात आघाडी, तर सध्या शिवसेना-भाजपा यांच्यात खटके उडत असले, तरी त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड शहरातही राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. त्यातच चार सदस्यांची प्रभाग पद्धती जाहीर झाल्याने तयारीला वेग आला आहे.
२०१२च्या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस निवडणुकीत स्वतंत्र लढले. १२८ पैकी राष्ट्रवादीने ८२ जागांवर विजय संपादन करीत एकहाती सत्ता स्थापन केली. त्यांना इतर पक्षांची गरज भासली नाही. तर काँगे्रस अवघ्या १४ जागांवरच मजल मारू शकली. राष्ट्रवादीने मागील निवडणूक स्वतंत्र लढली असली, तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपा, सेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही राजकीय गणिते बदलू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेदेखील नियोजन सुरू केले आहे. मागील वेळी स्वतंत्र लढले असले, तरी यंदा मित्रपक्षाला सोबत घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे
सत्ताधारी राष्ट्रवादीला शह देऊन महापालिकेत सत्तेत येण्यासाठी
दोन्ही पक्षांना मोठी ताकत लावावी लागणार आहे. यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही दोन्ही पक्षांत युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपात खटके
मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती असतानाही दोन्हींच्या वाट्याला फारशा जागा आल्या नाहीत. शिवसेनेला १४, तर भाजपाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. त्यामुळे यंदा सत्तेत येण्यासाठी हवी असणारी ‘मॅजिक फिगर’ गाठता यावी, यासाठी हे दोन्ही पक्ष तयारीत आहेत. मात्र, सध्या दोन्ही पक्षांत वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडत आहेत.
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँगे्रस८२
शिवसेना१५
काँगे्रस१३
मनसे०४
भाजपा०३
आरपीआय०१
अपक्ष आघाडी१०
एकूण१२८