अमित शाहांचा चिंचवड दौरा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, १०० पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By नारायण बडगुजर | Published: August 6, 2023 07:01 PM2023-08-06T19:01:40+5:302023-08-06T19:03:47+5:30

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील ‘डिटेन्ड’ करण्यात आले होते

Amit Shah visit to Chinchwad and he in the police station all day Preventive action against more than 100 persons | अमित शाहांचा चिंचवड दौरा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, १०० पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

अमित शाहांचा चिंचवड दौरा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, १०० पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

googlenewsNext

पिंपरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे रविवारी सहकार क्षेत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शंभरपेक्षा जास्त जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील ‘डिटेन्ड’ करण्यात आले होते. 

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त काही राजकीय पक्षांकडून तसेच काही संघटना व व्यक्तींकडून आंदोलन तसेच निषेध व्यक्त करण्यात येणार होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरातील काही पोलिस ठाण्यांकडून नोटीस देखील बजावण्यात आल्या होत्या. मंत्र्यांचा ताफा मार्गस्थ होणार असलेल्या मार्गावरील रस्त्याच्या कडेला, पदपथावर तसेच अनधिकृत पार्क केलेल्या हजारो वाहनांना हलविण्यात आले. तसेच पथारीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले यांना देखील या मार्गावर मनाई करण्यात आली होती. 

 ‘त्यांच्या’ घरी धडकले पोलिस

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या घरी सकाळपासून पोलिस दाखल झाले होते. तसेच इतर काही जणांकडेही पोलिस गेले होते.

ताफा मार्गस्थ झाल्यानंतर सोडले

अनेकांना पोलिस ठाण्यांमध्ये आणले होते. अमित शाह यांचा कार्यक्रम होऊन त्यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी पोलिस ठाण्यातून त्यांना सोडण्यात आले. 

वाहनधारक, व्यावसायिक यांना नोटीस

व्हीआयपींच्या दौऱ्यानिमित्त प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. रविवारी देखील अशी कारवाई केली. तसेच ताफा जाणार असलेल्या मार्गावरील अवैध पार्क केलेली वाहने हलविण्यात आली होती. त्यासाठी संबंधित वाहनधारक, व्यावसायिक यांना नोटीस दिल्या होत्या. - गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

पोलिस ठाणे - प्रतिबंधात्मक कारवाई केलेले

वाकड                     ४१
चिंचवड                   २२
निगडी                     ११
चिखली                     ५
भोसरी                      २
 पिंपरी                      १
सांगवी                      २

Web Title: Amit Shah visit to Chinchwad and he in the police station all day Preventive action against more than 100 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.