अमित शहांचा चिंचवड दौरा अन् आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत

By विश्वास मोरे | Published: August 6, 2023 12:25 PM2023-08-06T12:25:50+5:302023-08-06T12:26:03+5:30

प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरोधात राजकारण करणाऱ्या आम आदमी पार्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न, हि शोकांतिका

Amit Shah's visit to Chinchwad and the arrest of his workers | अमित शहांचा चिंचवड दौरा अन् आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत

अमित शहांचा चिंचवड दौरा अन् आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत

googlenewsNext

पिंपरी : गृहमंत्री अमित शहांचा आज पिंपरी चिंचवड मधील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. 

 सकाळी ७ वाजल्यापासूनच आपच्या पदाधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड मधील विविध पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले असून जोपर्यंत अमित शहा शहरांमध्ये आहेत तोपर्यंत कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशन मध्ये नजरकैदेत ठेवले आहे. 

बेंद्रे म्हणाले, मोदी सरकार २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात पराभूत होण्याच्या दिशेने आहे. त्यामुळे वारंवार मोदी आणि अमित शहा यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. महागाई भ्रष्टाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाला देश कंटाळलेला आहे. प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरोधात राजकारण करणाऱ्या आम आदमी पार्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ही शोकांतिका आहे. 

 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत चिंचवड, चिखली, पिंपरी, देहूरोड,  निगडी अशा पोलीस स्टेशनमध्ये आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, अनुप शर्मा, राज चाकणे, डॉ. अमर डोंगरे,  वैजनाथ शिरसाठ,संतोष इंगळे, कमलेश रणवरे, सीताताई केंद्रे, चांद मुलानी,  रशीद अत्तार, मोसिन गडकरी,  कुशल काळे, स्वप्नील जवळे, सचिन पवार अशा अनेक  आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना  स्थानबद्ध करून नजर कैद करण्यात आले आहे.

Web Title: Amit Shah's visit to Chinchwad and the arrest of his workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.