अमृता विद्यालयाचे चौफेर यश

By Admin | Published: September 8, 2016 01:21 AM2016-09-08T01:21:44+5:302016-09-08T01:21:44+5:30

महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालयमने चार वयोगटांत विजेतपद पटकावीत चौफेर यश मिळविले.

Amrita Vidyalaya's coveted achievement | अमृता विद्यालयाचे चौफेर यश

अमृता विद्यालयाचे चौफेर यश

googlenewsNext

पिंपरी : महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालयमने चार वयोगटांत विजेतपद पटकावीत चौफेर यश मिळविले. अभिषेक विद्यालय, म्हाळसाकांत विद्यालय यांनीही आपल्या गटात विजेतेपद मिळविले.
१४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात अमृता विद्यालयमने उर्सुला विद्यालयाचा ११-५, ११-९, ११-७ असा पराभव केला़ तर अभिषेक विद्यालयाने तिसरे स्थान पटकाविले़ १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अमृता विद्यालयमने सेंट उर्सुला संघाचा ११-२, ११-२ असा पराभव केला़, तर विद्यानंद भवन संघाने तिसरे स्थान पटकाविले़ १७ वर्षांखालील मुलींच्या अंंतिम सामन्यात अभिषेक संघाने अमृता विद्यालयमचा ११-६, ११-९ असा पराभव केला़ सेंट उर्सुला संघाने तृतीय क्रमांक पटकाविला़ १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात अमृता विद्यालयमने अभिषेक विद्यालयाचा ११-७, ११-२ असा पराभव केला़ सेंट उर्सुला संघाने तृतीय क्रमांक पटकाविला़ १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात अमृता विद्यालयमने उर्सुला विद्यालयाचा ११-९, ११-४ असा पराभव केला़ १९ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात म्हाळसाकांत संघाने सेंट उर्सुला संघाचा ११-८, ११-८ असा पराभव केला़ अमृता ज्युनियर महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला़
यमुनानगर, निगडी येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन अमृता विद्यालयम्च्या मुख्याध्यापिका ब्रह्मचैतन्या पावनामृता, क्रीडा विभाग प्रमुख चंद्रशेखर कुलकर्णी, पर्यवेक्षिका आशा ढवळे यांच्या हस्ते झाले. राजश्री धुरी, भक्ती थोरा, सुभाष चिंचोले, सचिन ववले, अनिल दाहोत्रे, अजित गायकवाड यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Amrita Vidyalaya's coveted achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.