शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून वास्तुशास्त्र तज्ज्ञाची आत्महत्या; चौघांना अटक
By रोशन मोरे | Published: August 7, 2022 06:11 PM2022-08-07T18:11:35+5:302022-08-07T18:11:59+5:30
पोलिसांनी अशोक मच्छिंद्र जानराव (वय ६१, रा. सांगवी), कुणाल अशोक जानराव (वय ३४) आणि दोन महिला यांना अटक केली
पिंपरी : शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून एका वास्तुशास्त्र तज्ज्ञाने स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ जुलैला विद्यानगर, नवी सांगवी येथे घडली होती. या प्रकरणी हवालदार सचिन ढवळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अशोक मच्छिंद्र जानराव (वय ६१, रा. सांगवी), कुणाल अशोक जानराव (वय ३४) आणि दोन महिला यांना अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचे नाव मारुती तरटे असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती तरटे यांनी २ जुलैला आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी मारुती तरटे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शेजारी राहणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. तसेच त्रास देणाऱ्या अशोक जानराव, कुणाल जानराव आणि दोन महिलांची नावे नमूद केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून ६ ऑगस्ट रोजी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच चौकशी करून अशोक जानराव, कुणाल जानराव आणि दोन महिलांना अटक केली.