उपप्रादेशिक कार्यालयात फुलवले ‘आनंद’वन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:49 AM2018-12-24T01:49:11+5:302018-12-24T01:53:03+5:30
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वर्षभरापूर्वी मोशीत स्थलांतर झाले असून आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आनंदवना’ची निर्मिती केली आहे.
- प्रकाश गायकर
पिंपरी - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वर्षभरापूर्वी मोशीत स्थलांतर झाले असून आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आनंदवना’ची निर्मिती केली आहे. त्यामुळे नागरिकांना सुखद गारवा अनुभवण्यास मिळत आहे.
माळरानावरील इमारतीत आरटीओचे स्थलांतर झाले तेव्हा चारही बाजंूनी हिरवळीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. पाटील यांनी येथे विविध प्रकारची झाडे लावली आहेत. सुगंधी फुले, फळांची व शोभेच्या झाडांचाही समावेश आहे. तसेच डेरेदार वृक्षांचीही लागवड केली आहे. सोनचाफा, गुलमोहर, कडुलिंबाचे रोपणही केले आहे. त्यामुळे येथे आल्हाददायकपणा जाणवतो. लोकसहभागातून येथे उद्यानाची निर्मिती केली आहे. परिसरामध्ये डेरेदार वृक्षांची लागवड करताना जेसीबीची मदत घेऊन पाच फूट झाडे लावली. त्यामुळे वर्षामध्येच झाडे वीस ते पंचवीस फुटांपर्यंत वाढली आहेत. पुढील वर्षापर्यंत ती डेरेदार होऊन परिसरामध्ये गारवा देतील. बाहेरील तापमानापेक्षा आरटीओ परिसरातील तापमान एक ते दोन अंशांनी कमी जाणवेल, असे येथील कर्मचाºयांनी सांगितले.
हिरवळ ही मनाला शांतता देते. कार्यालय सुरू झाले तेव्हा झाडांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे निरस आणि भकास वाटायचे. वृक्षारोपण केल्यानंतर येथील वातावरणामध्ये फरक पडला आहे. उन्हाळ््यात तापमान कमी होते. त्याचा फायदा इथे येणाºया नागरिकांना होणार आहे. आनंदवन साकारण्यात सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी मदत केली. - आनंद पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी