Anant Chaturdashi 2022| घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप! पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणुका

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: September 9, 2022 06:06 PM2022-09-09T18:06:07+5:302022-09-09T18:06:07+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती....

Anant Chaturdashi 2022 A devotional farewell to household fathers! A procession of traditional instruments | Anant Chaturdashi 2022| घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप! पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणुका

Anant Chaturdashi 2022| घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप! पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणुका

Next

पिंपरी : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशी बाप्पाकडे भावना व्यक्त करत शुक्रवारी घरगुती गणरायाला भक्तीपूर्ण निरोप दिला. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात मूर्ती विसर्जन करून शहरवासीयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवली.

विघ्नहर्ता गणेशाची यंदा घरोघरी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस रंगणाऱ्या भक्तीच्या या मेळ्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे. गणरायाची मनोभावे पूजाकरून भक्तांनी घरगुती बाप्पांना निरोप दिला.

महापालिकेकडून कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात सकाळी सात वाजल्यापासून नागरिक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सायंकाळी पाच नंतर शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेली. मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी सातारकरांनी राजपथावर गर्दी केली होती.

घाटावर संरक्षित जाळ्या, मूर्ती दान करण्याचे आवाहन
पवना नदीत पाणी जास्त असल्याने जाधव घाट तसेच चिंचवडमधील विसर्जन घाटांवर लोखंडी संरक्षित जाळ्या लावण्यात आल्या होत्या. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे मिरवणूक सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. घाटांवर विविध संस्थांकडून मूर्तीदानचे आवाहनही करण्यात येत असून त्यास गणेशभक्तांकडून प्रतिसादही उत्तम मिळत आहे.

Web Title: Anant Chaturdashi 2022 A devotional farewell to household fathers! A procession of traditional instruments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.