...अन् चेंबरची झाली दुरुस्ती; रिफ्लेक्टरही हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:17 AM2017-08-02T03:17:15+5:302017-08-02T03:17:15+5:30
कोकणे चौक ते रहाटणीगाव या मार्गावर असलेल्या नादुरुस्त चेंबरबाबत तसेच सांगवी फाटा येथील भुयारी मार्गातील तुटलेल्या रिफ्लेक्टरचा वाहनचालकांना धोका याबाबत ‘व्हॉट्सअॅप रिपोर्टर’ ने दिलेली बातमी
रहाटणी : कोकणे चौक ते रहाटणीगाव या मार्गावर असलेल्या नादुरुस्त चेंबरबाबत तसेच सांगवी फाटा येथील भुयारी मार्गातील तुटलेल्या रिफ्लेक्टरचा वाहनचालकांना धोका याबाबत ‘व्हॉट्सअॅप रिपोर्टर’ ने दिलेली बातमी लोकमत प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत चेंबरची दुरुस्ती करण्यासह तुटलेला रिफ्लेक्टरही हटविला.
शहराच्या विविध भागांतील समस्या वाचकांनाही मांडता याव्यात यासाठी लोकमतने व्हॉट्सअॅप रिपोर्टर हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात सहभाग घेत लोकमतचे वाचक एस. एऩ कुंभार यांनी रहाटणी आणि सांगवी फाटा येथील समस्या व्हॉट्सअॅपद्वारे मांडल्या. त्यास लोकमतमध्ये प्रसिद्धी दिल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.
रहाटणी येथील मार्गावरील धोकादायक लोखंडी जाळ्यांचे चेंबर हटवून त्याठिकाणी नवीन सिमेंटचे चेंबर बसविले तर सांगवी फाटा येथील भुयारी मार्गातील तुटलेले रिफ्लेक्टर त्या ठिकाणाहून हटविले.
यामुळे अनेक दिवसांपासून होणारी नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.