.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:37 PM2018-08-06T14:37:17+5:302018-08-06T17:48:20+5:30

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने चोरीच्या प्रयत्नात असलेले चोरटे पसार झाले. त्यामुळे महाराजांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेचे परिसरात कौतुक होत आहे.

.... and thieves Ran away | .... आणि चोरट्यांनी धूम ठोकली  

.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली  

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांची पहाटे चारच्या सुमारास दोन जणांना अटक

मावळ : पुणे-मुंबई रोडवर ब्राह्मवाडी हद्दीत गुरूनानक ढाब्यावर चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २३ हजार लुटल्यानंतर चोरटे मावळ बाजारपेठेतील कन्हैयालाल बाफना या सोन्याचांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी साध्वी अनुप्रेक्षजी महाराज यांच्यामुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. तसेच दोन आरोपी पोलिसांनी पकडले.
 अमोल भगवंत शिंदे (रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. चांदवडी फाटा राजगुरुनगर) अजय सुरकास पवार (रा. राजगुरुनगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांचे अन्य साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूनानक ढाब्यावर हनुमंत परमेश्वर क्षीरसागर हा चालक ट्रकमध्ये झोपला होता. त्याला चाकूचा धाक दाखून त्याच्या कडील २३ हजार ५०० रुपये व दोन मोबाइल घेतले. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास बाफना याच्या दुकानाच्या मागच्या खिडकीचे लोखंडी गज कापले. पाठीमागे बसविलेले  कॅमेरे यांचे तोंड वर फिरवले. त्या वेळी त्यांच्या पत्नीनीने चोरांना वरच्या मजल्याच्या खिडकीतून पाहिले. घरातील सर्वजण ओरडू लागले. पण आजूबाजूचे कुणी जागे झाले नाही.  
अखेर महाराजांमुळे मोठा अनर्थ टळला..
बाफना याच्या घराच्या मागे महावीर भवन आहे. चातुर्मास असल्याने त्या ठिकाणी महाराज आहेत. त्याचे ध्यान, तप चालू होते. ओरडण्याचा आवाज अनुप्रेक्षजी महाराज यांना आला. त्यानी राजेश बाफना यांना फोनवरून ही माहिती दिली. राजेश यांनी पोलिसांना  पहाटे तीन वाजता माहिती कळवली पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबा शिंदे, पी. बी. टेकाळे, दिलीप सुपे, विरणक प्रवीण, शशिकांत लोंढे हे अवघ्या पाच मिनिटांत तेथे आले. दरोडेखोर पळून गेले होते. पाठलाग करून दोघांना पकडले.

Web Title: .... and thieves Ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.