जलपर्णीमुक्त अभियानात सहभागी होणार अंजली भागवत; रावेत येथे पवनामाई स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:36 AM2018-02-03T11:36:20+5:302018-02-03T11:40:13+5:30

रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत.

Anjali Bhagwat will participate in Pavna river clean Campaign at Ravet | जलपर्णीमुक्त अभियानात सहभागी होणार अंजली भागवत; रावेत येथे पवनामाई स्वच्छता मोहीम

जलपर्णीमुक्त अभियानात सहभागी होणार अंजली भागवत; रावेत येथे पवनामाई स्वच्छता मोहीम

Next
ठळक मुद्देरविवारी सकाळी रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान अभियानाला सुरुवातीपासून विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत.
अंजली भागवत जलपर्णी मोहिमेत सहभागी होत असल्याने मोहिमेतील सर्वांना काम करण्यासाठी उत्साह आला आहे. तसेच विविध संघटना अभियानामध्ये जोडल्या जात आहेत. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे पदाधिकारी व सदस्य मागील तीन महिन्यांपासून पवनामाईला जलपर्णीमुक्त करण्यासाठी अविरत काम करीत आहेत. पवना नदीच्या उगमापासून ते पवना नदीच्या संगमापर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेकडो ट्रक जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आहे. याचाच पुढील टप्पा ४ फेब्रुवारी २०१८ ला पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे सकाळी ८ वाजता राबविण्यात येणार आहे. अभियानाला सुरुवातीपासून विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानाला सुरुवात होणार आहे. असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.

Web Title: Anjali Bhagwat will participate in Pavna river clean Campaign at Ravet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.