स्वाइन फ्लूचा आणखी एक रूग्ण, दहा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 03:15 AM2017-08-26T03:15:24+5:302017-08-26T03:15:39+5:30
पावसाळा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. थंडी-ताप, डेंगी, मलेरियाच्या रुग्णांबरोबरच स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात शुक्रवारी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. थंडी-ताप, डेंगी, मलेरियाच्या रुग्णांबरोबरच स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात शुक्रवारी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे.
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच शहरातील विविध भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात जानेवारीपासून एकूण सात लाख ९७ हजार ९६ रुग्णांची तपासणी केली आहे. त्यांपैकी स्वाइन फ्लूसदृश तापाचे रुग्ण ६८ हजार ६५० आढळले असून, त्यांपैकी ७२१४ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. त्यांपैकी ५५७ जणांची थुंकी आणि रक्ततपासणी केली. त्यात २८७ ग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दहा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची सुविधा
पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह शहरातील एकूण १० रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू बाबत कक्ष निर्माण केले आहेत. आज महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात ३०१ रूग्णांची तपासणी केली. त्यापैकी २७ जण स्वाईन फ्लू सदृश्य तापाचे रूग्ण आढळले. त्यापैकी एक जणांच्या थुंकीचे नमुने प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यामध्ये एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. तर तर यापूर्वी रूग्णालयात १९ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकुण ५५७ रूग्ण अॅडमिट केले होते. त्यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.