पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 08:07 PM2021-12-21T20:07:16+5:302021-12-21T20:24:06+5:30
परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील ४६ जणांची कोरोना तपासणी पाॅझिटिव्हिट आली आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ऑमायक्रॉनचा (omicron news case in pimpri chinchwad) एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची प्रकृती स्थीर आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाने दिली.
सद्यस्थितीत शहरात ओमायक्रॉनचे दोन सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण शहराबाहेरील असून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये परदेशातून आलेल्या ५ जणांचा समावेश आहे, तर शहरातील त्यांच्या संपर्कातील ७ जणांचा समावेश आहे. यापैकी १० रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील ४६ जणांची कोरोना तपासणी पाॅझिटिव्हिट आली आहे. त्यापैकी ३० रुग्णांची पून्हा दहाव्या दिवशी कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्व रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरीत परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील रुग्णांची कोरोना तपासणी करण्याचे कामकाज सुरू आहे.