किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक विशेष पथक; विनय कुमार चौबे यांची माहिती

By नारायण बडगुजर | Published: June 13, 2023 10:08 PM2023-06-13T22:08:57+5:302023-06-13T22:10:02+5:30

सुलोचना आवारे यांचे उपोषण

Another special team to investigate the murder of a juvenile stray; Information from Vinay Kumar Chaubey | किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक विशेष पथक; विनय कुमार चौबे यांची माहिती

किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक विशेष पथक; विनय कुमार चौबे यांची माहिती

googlenewsNext

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणी तपासासाठी आणखी एक विशेष पथक ‘एसआयटी’च्या मदतीला देण्यात आले आहे.

बांधकाम साईटवर बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याच्या संशयावरून किशोर आवारे आणि भानु खळदे यांचा मागील वर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत वाद झाला. यामध्ये किशोर आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली. त्या रागातून भानू खळदे याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून १२ मे रोजी दुपारी चार जणांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर किशोर आवारे यांची हत्या केली. या घटनेनंतर भानू खळदे पळून गेला.

दरम्यान, याप्रकरणाचा तपास गतीने करून मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी मंगळवारी उपोषण केले. त्यानंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती पोलिस आयुक्तांनी सुलोचना आवारे यांना दिली.

या प्रकरणामुळे मावळ परिसरात राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. हत्येच्या घटनेमध्ये राजकीय वादातून काही लोकांची नावे गोवल्याचा आरोप एक गट करत आहे तर दुसरा गट वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून घडवून आणल्याचा दावा करत आहे.

दोन पथके मागावर

किशोर आवारे हत्या प्रकरणी गौरव खळदे याला अटक केली. मात्र, त्याचे वडील भानू खळदे अद्याप फरार आहे. त्याच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.

किशोर आवारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे एसआयटीच्या प्रमुख होत्या. दरम्यान, कट्टे यांची बदली झाली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे एसआयटीचा कार्यभार सोपविण्यात आला. गुन्हे शाखा युनिट पाच, गुंडा विरोधी पथक ही दोन्ही पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित केली. तसेच एसआयटीला अन्य एक पथक मदतीला देण्यात आले आहे.- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Another special team to investigate the murder of a juvenile stray; Information from Vinay Kumar Chaubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.