शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी, आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 04:14 AM2017-08-20T04:14:08+5:302017-08-20T04:14:13+5:30
स्वाइन फ्लूमुळे पिंपळे निलख येथील ६३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका रुग्णाला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे पिंपळे निलख येथील ६३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका रुग्णाला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर रुग्णाला सर्दी, तापाचा त्रास होऊ लागल्याने १५आॅगस्ट (सोमवारी) रोजी ताथवडे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करून घशातील द्रव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्याच दिवशी उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. जानेवारीपासून ३४ रुग्णांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. स्वाइन फ्लूचे
रुग्ण दिवसेंदिवस आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या ३४२१ रुग्णांमधील २७५ जणांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याचे दिसून आले. त्यातील ३७ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या असून २ रुग्णांच्या घशातील द्रव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. १ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.