शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:24 AM2017-10-02T03:24:58+5:302017-10-02T03:25:02+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. स्वाइन फ्लूने आज आणखी एकाचा बळी घेतला. वर्षभरात मृतांची संख्या ५३ वर गेली आहे.

Another victim of swine flu in the city | शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. स्वाइन फ्लूने आज आणखी एकाचा बळी घेतला. वर्षभरात मृतांची संख्या ५३ वर गेली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. घरोघरी होणारा कचरा उचलला जात नाही, तसेच प्रक्रिया वेळेवर केली जात नाही. घनकचºयाचे नियोजन फसले आहे. तसेच जीएसटीच्या कचाट्यात स्वाइन फ्लूविषयक औषधांची खरेदीही थांबली होती. शहर परिसरातील महापालिकांच्या रुग्णालयांतही डेंगी आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. वातावरणात बदल होत असल्याने मलेरिया, थंडी-ताप या साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रुग्णालयांमधील तपासणी करण्यात येणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे.
स्वाइन फ्लूमुळे देहूगाव येथे राहणाºया साठवर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३२८ रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. देहूगाव येथील साठवर्षीय रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून २७ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल केले होते.

Web Title: Another victim of swine flu in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.