‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश

By नारायण बडगुजर | Published: December 21, 2023 03:57 PM2023-12-21T15:57:49+5:302023-12-21T15:58:11+5:30

महापालिका, कामगार आयुक्त विभाग, पोलिस प्रशासन, अग्निशमन विभाग या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुकामुळे कष्टकरी कामगारांचा मृत्यू

Answer the death of 14 working women in Talawade the outcry of the workers | ‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश

‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश

पिंपरी : तळवडे परिसरामध्ये ८ डिसेंबर रोजी झालेल्या स्फोट अपघातामध्ये १४ कष्टकरी महिलांचामृत्यू झाला. यामध्ये महापालिका, कामगार आयुक्त विभाग, पोलिस प्रशासन, अग्निशमन विभाग या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुकामुळे कष्टकरी कामगारांचा मृत्यू झाला असून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच मृतांच्या वारसास प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात यावे. पिंपरी - चिंचवड शहरातील कंपन्या कारखाने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे, कामगारांचे सोशल ऑडिट करावे या मागण्यासाठी मनपा गेटवर तीव्र आंदोलन करण्यात आले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात आंदोलन झाले. जेष्ठ नेते मानव कांबळे, राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंद्रन कुमार, महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, महिला अध्यक्ष माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, अर्चना कांबळे, निमंत्रक किरण साडेकर, संतोष माळी, सलीम डांगे, समाधान जावळे, सलीम शेख, राजू पठाण, संभाजी वाघमारे, इंदुबाई वाकचौरे, नंदा तेलगोटे, जरीता वाठोरे, सुनीता पोतदार, वहिदा शेख, मुमताज शेख, मनोज यादव, आशिष शेख, सागर ठोंबरे, अमोल भंडारी उपस्थित होते.

काशिनाथ नखाते म्हणाले, शहरातील कामगारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढलेले असून याला प्रशासकीय यंत्रणा दोषी आहे. ज्यांच्या चुकांमुळे असे मृत्यू झालेले आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी महापालिकेने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.’’ 

मानव कांबळे म्हणाले, ‘‘कामगारांच्या जीवाला कवडीमोल समजले जाते. कामगारांची किंमत काय आहे हे पुढील कालावधीमध्ये सरकारला दाखवावे लागेल.’’

चंदन कुमार म्हणाले, ‘‘कंपन्यांचे सोशल ऑडिट होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जबाबदारी स्वीकारून कामगार आणि कंपनीतील सुरक्षा याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.’’ 

कामगारांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची भेट घेतली. अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत याची खबरदारी प्रशासन स्तरावर योग्य रीतीने घेण्याचे काम सुरू आहे. महापालिका जबाबदारीने सर्वेक्षण करत आहे, असे जांभळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

Web Title: Answer the death of 14 working women in Talawade the outcry of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.