पिंपरी महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'धाड'; पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 03:52 PM2023-03-21T15:52:02+5:302023-03-21T15:52:48+5:30
प्रशासकीय काळामध्ये ठेकेदारांकडून कामे करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये आज दुपारी अडीच वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागातील लिपिकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे एक लाख रुपयांची रोकड सापडली.
महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय काळामध्ये ठेकेदारांकडून कामे करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणीपुरवठा विभागातील निविदेचे काम करण्यासाठी लिपिकाने एका ठेकेदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लिपिकास रंगेहाथ पकडले आहे. त्याची चौकशी अद्याप सुरू आहे.