क्षयरोग विरोधी जनजागृती
By Admin | Published: March 25, 2017 03:50 AM2017-03-25T03:50:25+5:302017-03-25T03:50:25+5:30
क्षयरोगाचे मोठे संकट आज उभे आहे. त्यावर मात करायची असेल तर सर्वांनी षकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन
पिंपरी : क्षयरोगाचे मोठे संकट आज उभे आहे. त्यावर मात करायची असेल तर सर्वांनी षकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य हॉल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी साळवे बोलत होते. सुरुवातीला क्षयरोगाचा जिवाणू शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला वैद्यकीय संचालक पवन साळवे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रमुख पाहूणे म्हणून टीबी सेलच्या डॉ. शार्दुल, आरएनटीसीपीचे सल्लागार डॉ. संदिप भारसवाडकर, वायसीएमचे फिजीशियन डॉ. किशोर खिलारे, निरामयचे दिपक साळूंखे आदी उपस्थित होते.
डॉट्स औषध प्रणाली अंतर्गत नवीन एकदिवशीय डेली रेजीमन औषध प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर गवळी व चंद्रशेखर सरवदे यांनी केले. (प्रतिनिधी)