‘सेल्फी विथ खड्डे’ अन् जिंका बक्षीस, विरोधी पक्षनेत्याचे नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:28 AM2018-07-18T02:28:05+5:302018-07-18T02:28:11+5:30

शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. भाजपाचे नेते मात्र शहरातील खड्डे बुजविले असल्याचा दावा करीत आहेत.

 Appeal for 'Selfie With Khadde' and Zinc Reward, People of Opposition Leader | ‘सेल्फी विथ खड्डे’ अन् जिंका बक्षीस, विरोधी पक्षनेत्याचे नागरिकांना आवाहन

‘सेल्फी विथ खड्डे’ अन् जिंका बक्षीस, विरोधी पक्षनेत्याचे नागरिकांना आवाहन

Next

पिंपरी : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. भाजपाचे नेते मात्र शहरातील खड्डे बुजविले असल्याचा दावा करीत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली अधिकारीसुद्धा खड्डे बुजविल्याची चुकीची आकडेवारी देत आहेत. वस्तुस्थिती दाखविण्यासाठी नागरिकांनीच त्यांच्या भागातील खड्ड्यांचा मोबाइलवर स्वत:सह घेतलेला फोटो पाठवावा. राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांकडे फोटो प्राप्त होताच, नागरिकांना शंभर रुपये बक्षीस दिले जाईल, अशी आगळीवेगळी बक्षीस योजना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी जाहीर केली.
शहरात मागील तीन महिन्यांपासून डांबरीकरणाची कामे करण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील या रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. भाजपाच्या नेत्यांकडून मात्र चुकीची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका साने यांनी केली.
>खड्डेमुक्ती केवळ कागदावर
शहरात खड्डेच खड्डे असताना केवळ ३४९ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण शहर खड्डेमुक्त झाल्याचे पत्र शहर अभियंत्यांनी दिले होते. खड्डेच खड्डे असताना असे उत्तर देऊन शहरवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. यासाठी शहरातील रस्त्यावर जेवढे खड्डे आहेत, ते निदर्शनास आणून देण्यासाठी लोकांचा सहभाग घेतला जात आहे. त्यासाठी सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम सुरू केला आहे. खड्ड्यांसोबतच सेल्फी काढून खड्ड्यांचे ठिकाण, स्वत:चे नाव व मोबाइल क्रमांक टाकून तो फोटो विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या ‘माझा सेल्फी विथ खड्डा’ या फेसबुक पेजला अपलोड करावा. तसेच वर्षा जगताप यांच्याकडे व्हॉटस अ‍ॅपद्वारे पाठवावा. हे फोटो आयुक्त आणि महापौरांनाही पाठविले जाणार आहेत.

Web Title:  Appeal for 'Selfie With Khadde' and Zinc Reward, People of Opposition Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.