समस्या सोडविण्यासाठी मत देण्याचे आवाहन

By admin | Published: February 13, 2017 01:46 AM2017-02-13T01:46:17+5:302017-02-13T01:46:17+5:30

मागील अनेक वर्षांपासून रहाटणी, तापकीरनगर, श्रीनगर परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नाही, या परिसरात अनेक नागरी समस्या आहेत

Appeal to vote for solving the problem | समस्या सोडविण्यासाठी मत देण्याचे आवाहन

समस्या सोडविण्यासाठी मत देण्याचे आवाहन

Next

रहाटणी : मागील अनेक वर्षांपासून रहाटणी, तापकीरनगर, श्रीनगर परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नाही, या परिसरात अनेक नागरी समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी व प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली साथ हवी आहे. त्यामुळे तुम्ही विकासाला मत द्या, असे प्रभाग क्रमांक २७ मधील सर्वसाधारण पुरुष गटातील अपक्ष उमेदवार विनोद तापकीर यांनी आवाहन केले.
विनोद तापकीर यांनी शास्त्रीनगर, ज्ञानदीप कॉलनी, पोलीस कॉलनी, यशदा कॉलनी, अंकुर कॉलनी, आदिनाथ कॉलनी, प्रभात शाळा परिसर, निर्मल कॉलनी, सवानी समर्थ कॉलनी, दत्त नगर, महाराष्ट्र नागरी, कृष्णा नागरी, गुरुदत्त हौसिंग सोसायटी, गजानन नगर या परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रचारातील अनेक जण हातात निशाणी चिन्ह बॅट प्रचारात सहभागी झाले होते, तर लहान मुलेदेखील रस्त्या-रस्त्यावर बॅट घेऊन खेळत असल्याने परिसर फक्त बॅटमय झाले होते. या वेळी तापकीर म्हणाले, ‘‘मी अपक्ष उभा आहे. निशाणी चिन्ह बॅटला मतदारांनी पसंती द्यावी, संधी द्यावी.’’ (वार्ताहर)

Web Title: Appeal to vote for solving the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.