पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील १३ निरीक्षकांची नेमणूक; सचिन हिरे सहायक पोलिस आयुक्तपदी
By नारायण बडगुजर | Published: March 9, 2024 04:49 PM2024-03-09T16:49:51+5:302024-03-09T16:50:10+5:30
नव्याने बदलून आलेल्या १३ पोलिस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांत तसेच गुन्हे शाखेत नेमणूक झाली....
पिंपरी : धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी-चिंचवडपोलिस दलात सहायक पोलिस आयुक्तपदी बदली झाली. यापूर्वी पोलिस आयुक्तालयात नव्याने बदलून आलेले सहायक आयुक्त देवीदास घेवारे यांनी देहूरोड विभागाचा तर सहायक आयुक्त राजू मोरे यांनी चिंचवड विभागाचा पदभार स्वीकारला. तसेच नव्याने बदलून आलेल्या १३ पोलिस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांत तसेच गुन्हे शाखेत नेमणूक झाली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. यात गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे आणि डाॅ. विवेक मुगळीकर यांची बदली झाली. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील अपर पोलिस अधीक्षक देवीदास घेवारे आणि सोलापूर शहर पोलिस दलाचे सहायक आयुक्त राजू मोरे यांचीही पिंपरी-चिंचवड पाेलिस दलात सहायक आयुक्तपदी बदली झाली.
दरम्यान, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांची विविध घटकांमध्ये बदली झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड दलात १३ पोलिस निरीक्षक बदली होऊन आले. त्यांची नियंत्रण कक्ष येथून विविध पोलिस ठाण्यांमध्ये नेमणूक केली गेली. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत या पोलिस निरीक्षकांना कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद आहे. याबाबत पोलिस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी केदार-कांगणे यांनी गुरुवारी (दि. ७) आदेश दिले.
नेमणूक केलेले पोलिस निरीक्षक
पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांची पिंपरी, शत्रुघ्न माळी यांची निगडी, निवृत्ती कोल्हटकर यांची वाकड, कन्हैया थोरात यांची हिंजवडी, प्रदीप रायन्नावार यांची तळेगाव दाभाडे, अंकुश बांगर यांची तळेगाव एमआयडीसी, जितेंद्र कोळी यांची चिंचवड, प्रमोद वाघ यांची चाकण, नितीन गीते यांची महाळुंगे, विजय वाघमारे यांची देहूरोड पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली. तसेच पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, गोरख कुंभार आणि संदीप सावंत यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली.