अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्ट्रक्चरल आॅडिटसाठी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:47 AM2019-02-21T01:47:44+5:302019-02-21T01:48:12+5:30
कार्यकारी संचालक : मेट्रो कामात अपघात रोखण्यासाठी दक्षता
पिंपरी : पुणे मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती महामेट्रोने केली आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे प्रकल्प कार्यकारी संचालक गौतम बिºहाडे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पिंपरी ते दापोडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असून यामध्ये नाशिक फाटा येथे ५ जानेवारीला पायलिंग रिंग मशिन कोसळून अपघात झाला होता. या अपघाताची चौकशी व ‘मेट्रोचे सेफ्टी स्ट्रक्चरल आॅडिट’ करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महामेट्रोकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार वाकडकर यांच्या पत्राला उत्तर देताना बिºहाडे यांनी ही माहिती दिली. पत्रात म्हटले आहे की, मेट्रोच्या कामाची गुणवत्ता व सुरक्षा यांची तपासणी फ्रान्समधील ब्युरो वेरिटास या कंपनीकडून केली जाते. तसेच पुणे मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती महामेट्रोने केली आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाचे काम सुरक्षितपणे प्रगती पथावर असून पुढील काळात कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही बिºहाडे यांनी नमूद केले आहे.
दोन अभियंते, रिंग आॅपरेटरना केले निलंबित
या अपघाताची चौकशी महामेट्रोने पूर्ण केली असून दोन अभियंते व रिंग आॅपरेटर यांना निलंबित केले आहे. पाईल काम करणाऱ्या कंपनीस पाच लाख रुपयांचा दंड महामेट्रोने केला असून, या अपघाताबाबत भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. यासह मेट्रो कामावर वापरण्यात येणाºया पाईल रिंग व क्रेनची तपासणी शासनमान्य संस्थेमार्फत करण्यात येते. मशिन आॅपरेटला ठरावीक कालावधीने प्रशिक्षण देणे, सर्व मशिन चालकांची वैद्यकीय तपासणी दर सहा महिन्यांनी वैद्यकीय अधिकाºयांमार्फत करणे, तसेच सुरक्षिततेबाबत वरिष्ठ सुरक्षा अधिकाºयांमार्फत माहिती व प्रशिक्षण देण्यात येते, अशीही माहिती मेट्रो रेल कॉर्पोरेशनने विशाल वाकडकर यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे.