मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 03:19 AM2018-12-09T03:19:20+5:302018-12-09T03:19:37+5:30

विधी समितीकडून बढतीच्या प्रस्तावाला मान्यता; शिक्षण, अग्निशामक व बांधकाम विभाग

Approval of the permission for the rightful executives | मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी

मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी

Next

पिंपरी : महापालिकेच्या विधी समिती सभेत शिक्षणाधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, कार्यकारी अभियंता पदावर मर्जीतील अधिकाºयांना आयत्यावेळी सदस्य प्रस्ताव मंजूर करून बढती दिली आहे. बढतीचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.

विधी समितीचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. आणखी पाच सभा होणार आहेत. दहा महिन्यांच्या कार्यकाळात विधी समितीसमोर कोणतेही विशेष प्रस्ताव आले नाहीत. त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निधी पदरात पडावा यासाठी अधिकाºयांना घेऊन बढत्यांचे विषय पुढे रेटण्याचे तंत्र विधी समितीने अवलंबिल्याची टीका होऊ लागली आहे. बढत्या मिळाव्यात यासाठी अधिकारी, पदाधिकाºयांच्या गाठीभेटी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून काही अधिकारी महापालिका प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

वैधता पाहूनच प्रस्तावावर कार्यवाही
विधी समितीची सभा झाली. अध्यक्षस्थानी माधुरी कुलकर्णी होत्या. या सभेत सदस्य प्रस्ताव करत सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना शिक्षणाधिकारी पदावर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना मुख्य अग्निशमन अधिकारी आणि स्थापत्य उपअभियंता दत्तात्रय रामगुडे यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती द्यावी, असे ठराव केले आहेत. हे ठराव सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासन त्यातील वैधता पाहून कार्यवाही करणार आहे. त्यामुळे ठराव अंमलबजावणीचे भवितव्य प्रशासनाच्या हाती असणार आहे.

महापालिका अधिकाºयांना बढती देण्यासंदर्भात प्रशासकीय ठरावाची वाट बघितली नाही. माझ्याकडे आलेले सदस्य ठराव मंजूर केले आहेत. या ठरावाचे काय करायचे ते महापालिकेची सर्वसाधारण सभा विचार करेल. ज्या अधिकाºयांना बढती दिली आहे. ते अधिकारी त्या पदासाठी पात्र आहेत. त्यामुळे बढती देण्यात आली आहे.

Web Title: Approval of the permission for the rightful executives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.