Pimpri Chinchwad: दारू पिताना वाद, मित्राला चाकूने भोसकले; ताथवडेमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:40 IST2023-06-19T11:35:36+5:302023-06-19T11:40:02+5:30
डेअरी फार्मच्या मोकळ्या मैदानात ताथवडे येथे ही घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास घडली...

Pimpri Chinchwad: दारू पिताना वाद, मित्राला चाकूने भोसकले; ताथवडेमधील घटना
पिंपरी : सहा मित्र दारू पीत असताना दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्यावेळी वाद सोडविणाऱ्या मित्राला दोन मित्रांनी चाकूने भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. डेअरी फार्मच्या मोकळ्या मैदानात ताथवडे येथे ही घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
अक्षय लोंढे (वय २२), अक्षय पाटील (वय २३, दोघे रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नितीन सुबराव थोरात (वय २८, रा. ताथवडे, पुणे, मूळ रा. धाराशिव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. नितीन थोरात यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन, त्यांचे मित्र सुमित लोंढे, इजाज सय्यद, समाधान, अक्षय लोंढे, अक्षय पाटील हे सहा जण शुक्रवारी रात्री डेअरी फार्मच्या मोकळ्या मैदानात दारू पित बसले होते. त्यावेळी सुमित लोंढे आणि अक्षय लोंढे यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादावरून पुन्हा बाचाबाची सुरू झाली. अक्षय लोंढे याने सुमित याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पोटात चाकूने भोसकून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.