कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:45 AM2023-04-27T11:45:32+5:302023-04-27T11:50:02+5:30

पोलिसांनी तरुणीसोबत साखरपुडा केलेला तरुण आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला...

arranged marriage to pay off debts; They took the money by torture on the pretext of taking them for a walk | कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे

कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे

googlenewsNext

पिंपरी : तरुणीसोबत साखरपुडा केला. तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने भावी पतीने तरुणीवर अत्याचार केला. तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. शेअर मार्केटमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी तरुणीला सहा लाखांचे कर्ज काढण्यास सांगितले. तरुणीने तिच्या नावे कर्ज काढून दिले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर फक्त पैशासाठी तुझ्यासोबत लग्न ठरवले होते. आता तुझ्यासोबत लग्न करणार नाही, परत लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. ही घटना ९ एप्रिल २०२२ पासून महाबळेश्वर, नानापेठे, संत तुकारामनगर येथे घडली. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २५) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तरुणीसोबत साखरपुडा केलेला तरुण आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा साखरपुडा आरोपीसोबत झाला होता. त्यामुळे फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. त्यासोबतच फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आरोपीच्या वडिलांनी देखील फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपल्या मुलाने शेअर मार्केटकरिता घेतलेले पैसे फेडण्यासाठी फिर्यादीस कर्ज काढण्यास भाग पाडून फिर्यादीच्या घरून ऑनलाइन पाच लाख २२ हजार रुपये घेतले. तसेच हे पैसे परत न करता फसवणूक केली. फिर्यादीसोबत किरकोळ कारणावरून भांडण केले. तसेच त्यांच्या मुलाने पैसे घेण्यासाठीच लग्न जमवले होते. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, जर पैसे मागायला आली तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: arranged marriage to pay off debts; They took the money by torture on the pretext of taking them for a walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.