आलिशान कार चोरणाऱ्या सराईताला गोव्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 08:37 PM2019-11-30T20:37:33+5:302019-11-30T20:41:41+5:30

ये हमारे कंपनी की गाडी है, मै लेने आया हूँ. आप ड्रॉप करने जा रहे है क्या? असे म्हणून सर्व्हिसिंगचे सात हजार रुपये रोख देत वसिमने विकासचा विश्वास संपादन केला. काही अंतर गेल्यानंतर वसिमने कार ताब्यात घेऊन धूम ठोकली. कार मालकाला कार पोहोचलीच नाही. त्यामुळे कार मालकाने सर्व्हिसिंग सेंटरकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

Arrested for stealing sluggish car from Goa | आलिशान कार चोरणाऱ्या सराईताला गोव्यातून अटक

आलिशान कार चोरणाऱ्या सराईताला गोव्यातून अटक

Next

पिंपरी : गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून केवळ आलिशान कार चोरणाऱ्या सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडीमधून चोरून नेलेली फॉर्च्युनर कार हस्तगत केली आहे.

वसिम कासीम सय्यद (वय ३२, रा. गुगल हाऊसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी हिंजवडी येथून एकाने फॉर्च्युनर कार चोरून नेल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. पोलीस पथक आरोपीचा माग काढत थेट गोव्यात पोहोचले. गोव्यातील रहिवासी असलेल्या आणि गोव्यासह, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलिशान कार चोरणाºया वसिमला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. विकास दारासिंग परदेशी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी विकास बावधन येथील एका शोरूममध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.

२१ नोव्हेंबरला सर्व्हिसिंगसाठी आलेली फॉर्च्युनर कार सर्व्हिसिंग करून तयार झाली. त्यानंतर ग्राहकाच्या घरी सोडण्यासाठी विकासने कार बाहेर काढली. सर्व्हिस सेंटर ते मधुबन हॉटेल, हिंजवडी या दरम्यान रस्त्यावर आरोपी वसिमने विकासला गाठले. ये हमारे कंपनी की गाडी है, मै लेने आया हूँ. आप ड्रॉप करने जा रहे है क्या? असे म्हणून सर्व्हिसिंगचे सात हजार रुपये रोख देत वसिमने विकासचा विश्वास संपादन केला. काही अंतर गेल्यानंतर वसिमने कार ताब्यात घेऊन धूम ठोकली. कार मालकाला कार पोहोचलीच नाही. त्यामुळे कार मालकाने सर्व्हिसिंग सेंटरकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपासाची सूत्रे हलवली.

फॉर्च्युनर कार चोरटा गोव्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तीन दिवस गोव्यात तळ ठोकून हिंजवडी पोलिसांनी आरोपी वसिमला फॉर्च्युनर कारसह ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी गोव्यात तीन, कर्नाटक येथे एक असे एकूण चार आलिशान कार चोरीचे गुन्हे केले आहेत. आलिशान कार विकल्यास त्यातून मोठी रक्कम मिळत असल्याने वसिम या आलिशान कार चोरून विकत असे. तपास पथकप्रमुख अनिरुद्ध गिजे, एम. डी. वरुडे, सहायक फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Arrested for stealing sluggish car from Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.