लाभार्थी गावांत होतेय कृत्रिम पाणीटंचाई
By admin | Published: April 2, 2017 03:00 AM2017-04-02T03:00:29+5:302017-04-02T03:00:29+5:30
पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद
खळद : पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डेया गावांना तसेच यांच्या वाडयावस्त्यांना पाणी पुरवठा होत असुन नागरीकांना जवळपास दहा दहा दिवस पाणी मिळत नाही यामुळे या भागातील नागरीकांचे पाण्याचे मोेठे हाल होत असतानाच येथील फिल्टर प्लांटवरून रोज पाच टँकरने दहा ते पंधरा फे-या होत असल्यानेया योजनेवर अधिक ताण येऊन नागरीकांचे पाण्याचे प्रचंढ हाल होत असल्याचेपाहावयास मिळत आहे.
येथे योजना उशाला आणि कोरड घशाला अशी परीस्थिती सध्या झाली असुन घराशेजारून पाण्याची लाईन गेली तर दारातुन रोज पाण्याचेटँकर भरून जात असल्याचेदिसत आहेपण आपली हक्काची योजना असतानाही घरात हंडाभर पाणी नाही यामुळेशासनानेतयार केलेल्या या कृत्रीम पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत. याबाबत आज सकाळी शिवरी येथे संतप्त नागरीकांनी पाण्याचे टँकर आडवून याचा जोरदार निषेध केला व परत टँकर न आणण्याची विनंती केली अन्यथा सर्व गावातील नागरीक महिला,पुरूष,युवक ,जनावरांसहीत रस्त्यावर उतरतील असा शासनाला खणखणीत इशारा दिला.य्शिवरी येथील फिल्टर प्लांटवर मात्र प्रत्याक्षात ४ ते५ हॉर्सपॉवरच्या पंपा इतकेच पाणी येते तर ज्यावेळी ही योजना झाली. त्यावेळची लोकसंख्या व आत्ताची लोकसंख्या यात तिपटीनेवाढ झाली आहेयामुळे हे पाणी या गावांना पुरविणेच या कर्मचा-यांना जिकरीचे होत आहे.
तहसीलदारांनी पाहणी करावी
साहेब इतर गावातील नागरीकांना पाणी मिळावेयांस आमचा विरोध नाही पण योजना आमची असताना आम्हालाच पाणी मिळत नाही ,आमचेच पाण्याचे हाल होत आहेत मंग आपण हेटँकर येथे च का पाठवता ? ४ तारखेला आमच्या या भागातील कावडी शिखर शिंगणापूरला पायी वारीसाठी प्रस्थान करणार आहेत यावेळी नोकरी व्यवसायानिमित्तानेबाहेर गेलेलेहजारो नागरीक तसेच मोठयाप्रमाणावर नातेवाईकही येणार असल्यानेयावेळी आम्ही पाण्याचेकाय करायचे? असा संतप्त सवाल करीत आपण येथे येऊन परीस्थितीची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली.
पिलाणवाडी जलाशयातील उपसा बंद करा
या योजनेला पाणी पुरवठा करणा-या पिलाणवाडी जलाशयातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असुन येथील पाणी हेआता पिण्यासाठीच राखीव होणे गरजेचेअसताना येथे राजरोस पणे शेतीसाठी पाणी उपसा होत असुन याचीही प्रशासनानेतातडीनेदखल घेत हा पाणी उपसा बंद करावा अन्यथा या पुढील काळात ऐन उन्हाळयात ,यात्रांच्या मोसमात तीव्र पाणी टंचाईला सामोरेजावेलागेल अशी भीतीही नागरीक व्यक्त करीत आहेत.