कलाकार संधीपासून वंचित : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 01:12 AM2018-12-22T01:12:16+5:302018-12-22T01:13:08+5:30

व्यक्तिचित्र रेखाटणे अवघड आहे. कलाकार कलेतून जिवंतपणा आणतो. मीही चित्र रेखाटते, म्हणून त्यातील थोडेफार कळते. कधी कधी चित्र केवळ कलाकारांनाच कळते.

 Artists deny opportunity: Pankaja Munde | कलाकार संधीपासून वंचित : पंकजा मुंडे

कलाकार संधीपासून वंचित : पंकजा मुंडे

Next

पुणे : व्यक्तिचित्र रेखाटणे अवघड आहे. कलाकार कलेतून जिवंतपणा आणतो. मीही चित्र रेखाटते, म्हणून त्यातील थोडेफार कळते. कधी कधी चित्र केवळ कलाकारांनाच कळते. मॉडर्न आर्ट म्हणून त्याकडे पाहिले जाते. कलाकाराने मनाने शीतल, कोमल असले पाहिजे. आपल्या कलाकारांकडे प्रतिभा आहे, पण त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. कलेसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे, असे मत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
चित्रकार शीतलकुमार गोरे यांनी रेखाटलेल्या ‘ एक वादळ चित्रबद्ध करताना ....! या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, शिल्पकार विवेक खटावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट होते.
कलाकाराला दु:ख झाले तरी त्यांच्या हातून कलाच साकारली जाते. त्याचप्रमाणे राजकारण्यांना आनंद झाला किंवा दु:ख झाले तरी त्यांनी जनतेची सेवाच केली पाहिजे. आम्ही सर्वजण त्यासाठीच आहोत असा विश्वासही मुंडे यांनी दिला.
बीड येथे आॅनर किलिंगची घटना घडल्याचे समोर आले आहे. याविषयी मुंडे म्हणाल्या, मी बीडच्या गुंडगिरीवर भाष्य करताना जिल्ह्याची गृहमंत्री आहे असे म्हणाले होते. ही घटना गंभीर असून त्याची मस्करी होऊ नये. गुंडगिरीचे आणि गुन्हेगारीचे समर्थन कोणी करू नये.

आदर्श गावच्या स्केचचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मी कुठे ही मिळेल त्या वेळेत स्केच काढत राहते. एकदा मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असताना आदर्श गावाचे एक स्केच काढले आणि बैठक संपताच मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना ते भेट दिले. त्या स्केचच मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले असल्याची आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.

Web Title:  Artists deny opportunity: Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.