पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:17 PM2018-09-23T18:17:49+5:302018-09-23T18:19:30+5:30
पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील निगडी येथे राहतात. रविवारी सकाळी आई सविता, वडील मनोहर आणि भाऊ कुलकर्णी सोनाली यांनी गणरायाला निरोप दिला. दरवर्षी सोनाली या आकुर्डीतील गणेश तलाव येथे दरवर्षी गणेश विसर्जन करत असतात. मात्र त्यांनी या वर्षी पर्यावरणपूरक शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. विसर्जनाच्या दिवशी रविवारी सकाळी कुटुंबियांसमवेत गणरायाला निरोप दिला व घरातील हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ''पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
अगं बाई अरेच्या फेम प्रियांका यादव यांनीही गणरायाला निरोप दिला. तिने बहिणीसमवेत चिचवड स्टेशन शाहू चौक येथील गणेशोत्सव मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या उत्सवातील श्रीराम रथ चित्ररथ लक्षवेधी होता.
यादव म्हणाल्या, '' राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असणाया गणेशोत्सव लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे काळाची गरज आहे. नागरिकांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण करणे टाळावे. गणेशोत्सवाचा आनंद लुटावा.''