अरुण गवळीची पत्नी मम्मीला तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 06:02 AM2018-04-25T06:02:04+5:302018-04-25T06:02:04+5:30

जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

Arun Gawli's wife Mamli temporarily gets bail | अरुण गवळीची पत्नी मम्मीला तात्पुरता जामीन

अरुण गवळीची पत्नी मम्मीला तात्पुरता जामीन

googlenewsNext

पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या प्रकरणात कुख्यात गुंड अरूण गवळी यांची पत्नी अशा ऊर्फ मम्मी अरुण गवळी यांना खेड न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर
केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी हा आदेश दिला आहे. पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावायची, तपासाला सहकार्य करायचे, तपासामध्ये ढवळाढवळ करायची नाही, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना द्यायचा, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडायचा नाही, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
याबाबत चंदननगर येथील एका व्यापाºयाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोमीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यादव, मुजावर आणि पठारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १३ ते १६ एप्रिल या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे चंदननगर येथे ड्रायफ्रुटचे दुकान आहे. याबरोबरच लोणी धामणी येथे एक दुकान आहे. तेथे त्यांच्या भावाचेही कपड्याचे दुकान आहे. ही तिन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे मोबाइलवरून ५ लाख रुपयांच्या खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Arun Gawli's wife Mamli temporarily gets bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.