पोलिसांना पाहताच ठोकली धूम; दारूभट्टीवर छापा, ४ लाखांचे रसायन नष्ट
By नारायण बडगुजर | Published: October 12, 2023 05:21 PM2023-10-12T17:21:58+5:302023-10-12T17:22:34+5:30
शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूच्या हातभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा
पिंपरी : पवना नदीच्या काठावरील गावठी दारूच्या हातभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. पोलिसांना पाहताच संशयिताने धूम ठोकली. या कारवाईत पोलिसांनी चार लाख ८१ हजारांचे साहित्य नष्ट केले. शिरगाव येथे बुधवारी (दि. ११) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही कारवाई केली.
नीलेश ज्ञानेश्वर पवार (३५, रा. शिरगाव, ता. मावळ), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार दिलीप राठोड यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे चार लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले. पोलिस आल्याची चाहूल लागताच नीलेश पवार पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.