उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 09:54 PM2018-07-28T21:54:10+5:302018-07-28T21:58:28+5:30
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.
पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखा, सिद्धी विनायक ग्रुपच्या वतीने भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली .
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. भाऊसाहेब भोईर म्हणाले, पुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायसक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा , सुरेश वाडकर, हरिहरन व सोनू निगम, सुनिधी चौहान यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. यंदाचा सोळावा पुरस्कार होत आहे. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उदित नारायण यांनी ३२ भाषांत अठरा हजार गाणी गायली असून लतातदीदी बरोबर २०० गाणी तर आशातार्इंबरोबर चारशेहून अधिक गाणी गायली आहेत. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ४ आॅगस्टला सायंकाळी साडेपाचला पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते अजित पवार, जेष्ठ संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी उदीत नारायण यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होईल.