निगडीत भुरट्या चोऱ्या वाढल्या

By admin | Published: April 26, 2017 03:54 AM2017-04-26T03:54:08+5:302017-04-26T03:54:08+5:30

परिसरात दिवसेंदिवस भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील घरे, सोसायट्यांमधून भंगार चोरी होणे, वाहनातील बॅटरी अथवा पेट्रोल चोरीला

The associated robbery thieves grew | निगडीत भुरट्या चोऱ्या वाढल्या

निगडीत भुरट्या चोऱ्या वाढल्या

Next

निगडी : परिसरात दिवसेंदिवस भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील घरे, सोसायट्यांमधून भंगार चोरी होणे, वाहनातील बॅटरी अथवा पेट्रोल चोरीला जाणे या घटना सातत्याने घडत आहेत. या चोऱ्या लहान स्वरूपाच्या असल्याने अनेक वेळा नागरिक पोलिसांत तक्रार करत नाहीत. त्यामुळे भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे.
घराच्या गॅलरीतून, खिडकीतून कपडे, मोबाईल खेळणी अशा वस्तू चोरीला जात आहेत. या चोरीच्या घटनामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरी वस्ती नाही. अशी ठिकाणे चोरट्यांनी लक्ष केली आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The associated robbery thieves grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.