शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:33 AM2017-08-05T03:33:33+5:302017-08-05T03:33:33+5:30
पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील शेतकºयांवरील गुन्हे ८ आॅगस्ट २०१७ रोजी शासकीय बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
येळसे : पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील शेतकºयांवरील गुन्हे ८ आॅगस्ट २०१७ रोजी शासकीय बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांच्याशी बैठकीत चर्चा केली. तेव्हा ते बोलत होते. ९ आॅगस्ट २०११ रोजी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात मावळातील शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांनी आंदोलकांच्या भावना समजून न घेता अमानूष लाठी चार्ज व बेछूट गोळीबार केला. त्यात एका महिलेसह तीन आंदोलकांचा मृत्यू झाला. सुमारे १९० शेतकºयांवर गुन्हे दाखल झाले होते.
भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, भारत ठाकूर, बाळासाहेब घोटकुले, अजित आगळे, राजेश मुºहे, संदीप भुतडा उपस्थित होते.