‘ज्योतिषांनी स्वत:ला देव समजू नये’

By admin | Published: October 5, 2015 01:31 AM2015-10-05T01:31:08+5:302015-10-05T01:31:08+5:30

डॉक्टर देवमाणूस नाही. ज्योतिषांनीही स्वत:ला देव मानू नये. सर्वसामान्यांचे आयुष्य गुणात्मक होण्यासाठी ज्योतिषांनी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र कसबेकर यांनी केले.

'Astrologers Do not Know God as Yourself' | ‘ज्योतिषांनी स्वत:ला देव समजू नये’

‘ज्योतिषांनी स्वत:ला देव समजू नये’

Next

पुणे : डॉक्टर देवमाणूस नाही. ज्योतिषांनीही स्वत:ला देव मानू नये. सर्वसामान्यांचे आयुष्य गुणात्मक होण्यासाठी ज्योतिषांनी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र कसबेकर यांनी केले.
बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे डॉ. रवींद्र खाडिलकर षष्ठ्यब्दीपूर्ती गौरव सोहळा आणि भविष्यकथन कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण रविवारी झाले. त्या वेळी डॉ. कसबेकर बोलत होते. उद्योजक विनय फडणीस, यशवंतराव
चव्हाण मुक्त विद्यापीठाचे
कुलसचिव उत्तमराव जाधव,
अरविंद चांदेकर, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार, उपाध्यक्ष विजय जकातदार व्यासपीठावर होते.
डॉ. खाडिलकर यांचा डॉ. कसबेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ. कसबेकर म्हणाले, ‘‘ज्योतिषाने नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावे, जणेकरून मनुष्याचे आयुष्य सुकर होेईल. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना दिला असता तर त्याचा उपयोग झाला असता असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या कार्याध्यक्ष अ‍ॅड. मालती शर्मा यांनी केले. मंडळातर्फे आयोजित ज्योषित प्रशिक्षण वर्गातील सहभागींनी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Astrologers Do not Know God as Yourself'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.