अतिउत्साहामुळे गेला तरूणाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:29 AM2017-07-31T04:29:36+5:302017-07-31T04:29:36+5:30

मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात पाय घसरून शनिवारी तरूण वाहून गेला होता.

ataiutasaahaamaulae-gaelaa-tarauunaacaa-jaiva | अतिउत्साहामुळे गेला तरूणाचा जीव

अतिउत्साहामुळे गेला तरूणाचा जीव

Next

तळेगाव दाभाडे : मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात पाय घसरून शनिवारी तरूण वाहून गेला होता. रविवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीमध्ये अतुल दशरथ पाटील (वय २५, रा. ढोलीगाव, ता. पारोळा, जि. जळगाव) मृतदेह सापडला.
पिंपरी-चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील अभियांत्रिकी शाखेचे नऊ विद्यार्थी वर्षाविहारासाठी शनिवारी कुंडमळा (इंदोरी) येथे आले होते. अतुल पाटील हा रांजणखळगे पाहत असताना पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहात पडला. एनडीआरएफच्या जवानांनी शनिवारी सुरू केलेली शोध मोहीम अंधारामुळे थांबविली होती.
रविवारी सकाळी बोट व पाणबुडीच्या साहाय्याने एनडीआरफच्या जवानांनी ही शोध मोहीम पुन्हा सुरू केली. अतुलच्या निधनाची वार्ता आकुर्डी परिसरात पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत नाही.
अतिउत्साह नडला-
इंद्रायणी नदीपात्रात कुंडमळा येथे रांजणखळगे आहेत. त्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरूण विविध कसरती करतात. शनिवारीही अशाच प्रकारे काहीजण उड्या मारत होते तर काही जण फोटो काढत होते. अतुल नदीत उडी मारतानाचे छायाचित्र त्याच्या मित्रांनी टिपले. ही उडी मारतानाच त्याचा तोल गेला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. फोटोसाठीचा अतिउत्साह अतुलसाठी जीवघेणा ठरला.

Web Title: ataiutasaahaamaulae-gaelaa-tarauunaacaa-jaiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.