एका तासात एटीएम रिकामे
By admin | Published: November 18, 2016 04:59 AM2016-11-18T04:59:58+5:302016-11-18T04:59:58+5:30
नोटा बंदचा निर्णय होऊन एक आठवडा झाला. तरीही बँकांसमोरील रांगा व गर्दी कमी होत नाही. शहरातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे
पिंपरी : नोटा बंदचा निर्णय होऊन एक आठवडा झाला. तरीही बँकांसमोरील रांगा व गर्दी कमी होत नाही. शहरातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएममध्ये गुरुवारी दुपारी रक्कम भरण्यात आली. परंतु पुरेशी रक्कम नसल्याने एका तासात एटीएम रिकामे झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
पिंपरी-चिंचवड शहरात शंभर मीटरवर किमान एकातरी बँकेचे एटीएम केंद्र आहे. आॅल टाईम मनी असणारे हे केंद्र आठवड्याभरापासून बंद होते. आज दुपारी काही बँकांच्या एटीएम सुरू करण्यात आले. मात्र, बँकेतून पुरेशी रक्कम भरण्यात आली नाही. एटीएममध्ये फक्त १००च्या नोटाच येत असल्याने तसेच फक्त २००० रुपये काढण्याची मुभा आहे. त्यामुळे तासाभरातच रक्कम संपल्याने नागरिकांचा संताप वाढला. (प्रतिनिधी)