‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:18 AM2018-09-01T01:18:47+5:302018-09-01T01:19:18+5:30

अमृता फडणवीस : महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य हवे

'Atrocities against children will require strict education' | ‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

Next

पुणे : समाजात लहान मुला-मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना संतापजनक असून, पुरूषांमधील ही दानवी वृत्ती मारायला पाहिजे. बालकांवर अत्याचार करणाºया आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी लहान मुलांवरील गंभीर घटनांवर बोट ठेवले. खास महिलांसाठी दागिने व कपड्यांच्या ‘कुटॉर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की आज समाजातच नव्हे, तर कुटुंबांमध्येही महिलांवर अत्याचार होत आहेत. आपले मूल्य आपल्यालाच समजायला हवे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. एकीकडे महिला प्रगतिपथावर जात आहेत तर दुसरीकडे त्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. महिलांवरील अत्याचारासंदर्भात एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला असून हे सुचिन्ह आहे. मुलगी झाल्यानंतर कन्या भाग्यश्री योजना वगैरे राबविल्या जात आहेत मात्र त्या वरवरच्या आहेत. मुलगी झाल्यानंतर काय, असा प्रश्न पडतो तेव्हा विविध क्षेत्रांतील महिलांचे आदर्श पालकांच्या डोळ्यासमोर ठेवायला हवेत.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग केले जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका होते. या ट्रोलिंगकडे कशा पद्धतीने पाहता, या विषयी विचारले असता त्या म्हणाल्या, की लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठीच आपण समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो आणि या माध्यमांवर ‘ट्रोलिंग’पासून कोणीही सुटत नाही. हे ट्रोलिंग आपण कसे घेतो ते महत्त्वाचे आहे. विचारांचे खंडन हे योग्य भाषेतच व्हायला हवे. परंतु ट्रोलिंगमधील महिलांसाठी अवमानकारक आणि दहशत पसरवू पाहणाºया पोस्ट मात्र निश्चित निंदनीय असून त्या थांबायला हव्यात. याबाबतीत गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी. मुख्यमंत्रीदेखील होणारी टीका सकारात्मक घेऊन त्याची दखल घेत सर्वसमावेशक चचेर्तून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.

आज ‘फॅशन आयकॉन’ अशी तुमची एक प्रतिमा निर्माण झाली आहे, या विषयी सांगताना त्या म्हणाल्या, मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतु ुमाझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते. व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी कपडे आणि फॅशन मदत करत असली, तरी आत्मविश्वास ही व्यक्तिमत्त्वातील सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. माझे अनेक कपडे ‘एनआयएफटी’ संस्थेच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते याचा आनंद आहे.

सध्याचे सरकार खºया अर्थाने ‘सक्षम’
गेल्या पाच वर्षांत महिला सबलीकरण, जलयुक्त शिवारसारख्या अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी झाली आहे. जे ५० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत झाले आहे. सध्याचे सरकार हे खºया अर्थाने ‘सक्षम’ असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.
 

Web Title: 'Atrocities against children will require strict education'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.