दिघीत एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:51 PM2018-08-22T20:51:31+5:302018-08-22T20:52:12+5:30
एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवरचे कॅमेरे सील करुन मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी: दिघी पोलीस ठाण्याच्या परिसरात एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीन कापता न आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी (दि.२१) पहाटे साडेतीनच्या सुमारास दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरी वडमुखवाडी येथे असलेल्या एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवर घडली.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी साईनगरी वडमुखवाडी येथे असलेल्या एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवरचे कॅमेरे सील करुन मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना ते कापताच न आल्याने त्याने तेथून पळ काढला. यामुळे संबंधित एटीएमचे तब्बल ५० हजारांचे नुकसान झाले आहे. दिघी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.