चिखली येथे विवाहितेस जिवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 28, 2016 03:21 AM2016-03-28T03:21:22+5:302016-03-28T03:21:22+5:30
मुली झाल्या या कारणावरून विवाहितेस विष पाजून जिवे मारण्याची घटना चिखली येथे उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह इतर सहा जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात
पिंपरी : मुली झाल्या या कारणावरून विवाहितेस विष पाजून जिवे मारण्याची घटना चिखली येथे उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह इतर सहा जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधिका (वय २३, रा. पाटीलनगर,चिखली) यांचा संतोष बन्सी पवार यांच्याशी १७ मे २०१२ मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. दरम्यान, दोन मुली झाल्याच्या कारणावरून संतोष हा राधिका यांचा
मानसिक छळ करीत होता. तसेच जमीन व दुचाकी खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी छळही करीत होता.
गुरुवारी राधिका या मुलींना भेटण्यासाठी सासरी आल्या असताना संतोष व इतर नातलग मंडळींनी राधिका यांना दोरीने बांधले व जबरदस्तीने तोंडात विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती संतोषसह इतर सहा जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.(प्रतिनिधी)