पुरातन काळातील धातूच्या नाण्याची विक्री करत फसवणुकीचा प्रयत्न; नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:58 PM2021-06-11T16:58:27+5:302021-06-11T16:59:53+5:30
गुरुवारी दुपारी आकुर्डीतील खंडोबामाळ येथे ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी : पुरातन काळातील धातूचे नाणे विकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ जणांना निगडी पोलिसांनीअटक केली आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून होमगार्ड वैभव तावरे यांना पुरातन काळातील धातूचे नाणे, लिबो कॉईन ज्यामध्ये हाय इरिडियम नावाचे केमिकल आहे. यामुळे या नाण्याला बाजारात दहा कोटी रुपयांची किंमत आहे, असे भासवून फसवणुकीच्या हेतूने होमगार्ड तावरे यांना विकण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलीस नाईक कंठय्या गुरय्या स्वामी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी खंडोबामाळ, आकुर्डी येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी हरीश परशुराम पाटील (वय ६८, रा. औरंगाबाद), संजय अर्जुन कुचेकर (वय ४२ रा. खराडी, पुणे), सुजित राजेंद्र सारफळे (वय २१, रा. उस्मानाबाद), प्रमोद रामचंद्र बचाटे (वय ४०, रा. उस्मानाबाद), राजेश विजयकुमार गोवर्धन (वय ४१, रा. उस्मानाबाद), रत्नाकर विजय सावंत, किशोर ज्ञानेश्वर भगत (वय ३६, दोघे रा. गोपाळनगर, डोंबिवली पूर्व), इमरान हसन खान (वय ४३, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून सात लाख रोख रक्कम, एक पुरातन काळातील नाणे, १,१९,५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल, ८,५०,००० रुपये किमतीच्या दोन कार, असा एकूण १६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला
---