वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याच्या प्रयत्न; मोशी येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 13:53 IST2020-09-14T13:44:35+5:302020-09-14T13:53:37+5:30
आरोपी ट्रकचालक याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला..

वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याच्या प्रयत्न; मोशी येथील धक्कादायक घटना
पिंपरी : वाहतूक नियमन करत असताना वाहतूक पोलिसाने एका ट्रकचालकाला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुणे-नाशिक महामार्गावर भारत माता चौक, मोशी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस कर्मचारी शंकर हिरामण रोकडे (वय ३५) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ट्रक चालक राहुल अशोक दातीर याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे भारत माता चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी चौकात आरोपी याचा हा ट्रक घेऊन आला. फिर्यादी यांनी ट्रक चालक याला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. आरोपी ट्रकचालक याने फिर्यादी वाहतूक पोलीस यांच्याकडे पाहत ट्रक त्यांच्या अंगावर चालवत रोकडे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रक चालक चौकातून पुढे निघून गेला. फिर्यादी यांनी दुचाकीवरून ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला ओव्हरटेक करत असताना आरोपी याने खोडसाळपणे फिर्यादी यांच्या दुचाकीला डाव्या बाजूला दाबून त्यांना पुढे जाऊ न देता पुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न केला