'मला आयुष्यात तूच हवी आहे...' म्हणत महिलेला धमकावून केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:02 PM2022-01-03T13:02:48+5:302022-01-03T13:04:16+5:30

पिंपरी : लग्नास नकार दिल्याने महिलेला धमकावले. तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे येथे १५ जुलै २०२१ ते ...

attempted suicide by threatening a woman for refusing to marry | 'मला आयुष्यात तूच हवी आहे...' म्हणत महिलेला धमकावून केला आत्महत्येचा प्रयत्न

'मला आयुष्यात तूच हवी आहे...' म्हणत महिलेला धमकावून केला आत्महत्येचा प्रयत्न

Next

पिंपरी : लग्नास नकार दिल्याने महिलेला धमकावले. तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे येथे १५ जुलै २०२१ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. २) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दत्ता अंकुश वाशिवले (रा. कोथरूड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीला लग्नास स्पष्ट नकार दिला असतानाही, आरोपीने फिर्यादीचा वारंवार पाठलाग केला. फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी व घरी येऊन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. मला आयुष्यात तूच हवी आहे, मी तुझ्या वाचून राहू शकत नाही, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला धमकावले. तसेच फिर्यादीच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: attempted suicide by threatening a woman for refusing to marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.