घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न, महिलेची बाल्कनीतून उडी; नालासोपाऱ्याच्या घटनेची पिंपरीत पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 01:18 PM2018-04-07T13:18:05+5:302018-04-07T14:50:33+5:30

अत्याचारापासून वाचण्यासाठी महिलेची बाल्कनीतून उडी

Attempted to torture in the house and jump from the balcony; Repeat of pneumonia | घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न, महिलेची बाल्कनीतून उडी; नालासोपाऱ्याच्या घटनेची पिंपरीत पुनरावृत्ती

घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न, महिलेची बाल्कनीतून उडी; नालासोपाऱ्याच्या घटनेची पिंपरीत पुनरावृत्ती

Next

पिंपरी - शुक्रवारी (6 एप्रिल) नालासोपारा येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती आज (शनिवार) पिंपरीमध्ये घडली आहे. घरात कोणी नाही, याचा गैरफायदा उठवीत ए्का आरोपीने रहाटणी येथील विवाहित महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने घराच्या गॅलरीतून उडी मारली. त्यात ती जखमी झाली असून आरोपी विरोधात वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.  

 

पीडित महिलेच्या पतीचा राजपूत नावाच्या इसमाने मोबाइल काढून घेतला. मोबाईल परत मिळविण्यासाठी महिलेचा पती त्या इसमाकडे गेला. त्याने मोबाइल दुसऱ्या एकाकडे दिला असल्याचे सांगितले. येथेच थांबा मी ज्याच्याकडे मोबाइल आहे , त्याला शोधून आणतो असे सांगून पीडित महिलेच्या पतीला रहाटणीपासून पुढे काही अंतर नेऊन थांबवून ठेवले. त्याचवेळी आरोपी रात्री दोनच्या सुमारास महिलेच्या घरी गेला. तेथे तुमच्या पतीला पोलिसांनी पकडले आहे चौकशीसाठी थांबून ठेवले असल्याचे सांगण्यास आलो आहे, असे कारण पुढे करत तो महिलेशी असभ्य वर्तन करू लागला.

आरोपी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच माहिलेने घराच्या मागील बाजूच्या गॅलरीतून उडी मारली. त्यात तिचा उजवा हात फॅक्चर झाला तर डाव्या हाताच्या बोटास मुकामार लागला आहे. ३० वर्षीय महिलेने जबरदस्ती करणाऱ्या आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी थेट घराच्या गॅलरीमधून खाली उडी मारल्यावर महिला खाली उभ्या असलेल्या चारचाकी मोटारीवर जाऊन पडली. या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.  

Web Title: Attempted to torture in the house and jump from the balcony; Repeat of pneumonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.