मिळकतकर न भरल्याने ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:47 AM2018-03-17T00:47:31+5:302018-03-17T00:47:31+5:30

वाल्हेकरवाडी येथील महाजन हॉस्पिटलने कर थकबाकी न भरल्याने महापालिका चिंचवड करसंकलन विभागाने हॉस्पिटलला शुक्रवारी टाळे ठोकले.

Avoid paying taxes without paying taxes | मिळकतकर न भरल्याने ठोकले टाळे

मिळकतकर न भरल्याने ठोकले टाळे

googlenewsNext

रावेत : वाल्हेकरवाडी येथील महाजन हॉस्पिटलने कर थकबाकी न भरल्याने महापालिका चिंचवड करसंकलन विभागाने हॉस्पिटलला शुक्रवारी टाळे ठोकले.
महापालिका प्रशासनाने रुग्णालय व्यवस्थापनाला थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी १२ मार्च रोजी नोटीस दिली होती. नोटिसीनुसार ८ लाख ८१ हजार ७७९ रुपये एवढी कराची रक्कम मुदतीत भरण्यात आली नाही.
याबाबत हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. श्यामकांत महाजन म्हणाले, मी मागील सात ते आठ वर्षांपासून हॉस्पिटल चालवीत आहे. या मिळकतीचा कर प्रत्येक वर्षी न चुकता वेळेत भरला आहे. परंतु शास्तीकर पुढे करून सदर रक्कम मला भरण्यासाठी करसंकलन विभाग वारंवार त्रास देत आहे.
शहरात कोणीच शास्तीकर भरत नाही; मग माझ्याबाबतीतच शास्तीकराचा आग्रह प्रशासन कशासाठी करीत आहे. ओपीडी चालू असताना क्लिनिकमध्ये दोन पेशंट होते. त्यांना व मला बाहेर काढून अन्यायकारक कारवाई केली आहे.

Web Title: Avoid paying taxes without paying taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.