‘जागते रहो’ उपक्रमास सुरूवात
By admin | Published: April 18, 2017 02:55 AM2017-04-18T02:55:28+5:302017-04-18T02:55:28+5:30
उपनगरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस यंत्रणेस मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र पुढे सरसावले
रावेत : उपनगरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस यंत्रणेस मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र पुढे सरसावले आहेत. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र आणि एसपीओ १६ वर्षांपासून शहर परिसरामध्ये उन्हाळ्याच्या सुटीमध्ये रात्रगस्त उपक्रम राबवीत आहेत. प्रमुख रस्ते, कमी वर्दळीची ठिकाणे, मुख्य चौक अशा ठिकाणी पोलीस मित्रांची विशेष मदत नागरिकांना, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना होत असते.
निगडी-आकुर्डी पोलीस चौकी येथे ‘जागते रहो’ उपक्रमास सुरुवात झाली. उपक्रमास प्रमुख मार्गदर्शन निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक शंकर औताडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे, वीरेंद्र चव्हाण, हवालदार संतोष बांबळे, समिती अध्यक्ष विजय पाटील करीत आहेत.
‘जागते रहो’ उपक्रमास प्रमुख गस्त विभागप्रमुख म्हणून बाबासाहेब घाळी, जयप्रकाश शिंदे, अमृत महाजनी, अर्चना दाभोळकर (घाळी), विद्या शिंदे, लीला दिवाण, रवी भावके, तुकाराम दहे, स्वप्नील चव्हाणके, अविनाश शिंदे, शलमोहन वंजारे, महेश कांबळे, घनश्याम सेन, सचिन मोरे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण ठाणांबीर, सागर चव्हाणके, प्रज्वल ख्याडगी, उद्धव कुंभार, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले यांची नेमणूक झाली आहे. (वार्ताहर)