गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड विभागात २१ गुन्हेगारांना प्रवेश अन् वास्तव्याला मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 07:30 PM2020-08-24T19:30:26+5:302020-08-24T19:31:41+5:30
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले २१ गुन्हेगारांना देहुरोड विभागातून प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई केली आहे.
पिंपरी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील २१ गुन्हेगारांवर देहुरोड विभागाच्या हद्दीत प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी तो प्रस्ताव मंजूर करून आदेश दिले आहेत. चिखली पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले २१ गुन्हेगारांना देहुरोड विभागातून प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई केली आहे. ३१ ऑगस्ट ते ते सप्टेंबर दरम्यान या गुन्हेगारांना देहुरोड विभागातील चिखली, देहुरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी हद्दिमध्ये प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय कदम, बाजीराव चौधर यांनी हा प्रस्ताव तयार करून कारवाई केली आहे.