Badminton शिकविणाऱ्या शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 19:15 IST2021-10-03T19:14:53+5:302021-10-03T19:15:49+5:30
शिक्षक बालेवाडी येथे बॅडमिंटन शिकविण्याचे काम करतो.

Badminton शिकविणाऱ्या शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी : बॅडमिंटन शिकविणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकणी पोलिसांनी क्रीडा शिक्षकाला अटक केली. बालेवाडी येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. राकेश यशवंत दलाल (वय ३६, रा. नांदे रोड, म्हाळुंगे, पुणे), असे अटक केलेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दलाल हा बालेवाडी येथे बॅडमिंटन शिकविण्याचे काम करतो. शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास शटल बॉक्स हे जीममधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. अल्पवयीन मुलगी ते साहित्य ठेवण्यास गेली असता आरोपी तिथे गेला. तू शुक्रवारी का खेळायला येत नाहीस. तू चांगली खेळाडू आहेस. मला तुला फार वरती घेऊन जायचे आहे, असे म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.